शिवार न्यूज नेटवर्क :
मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाला असला तरी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई,ठाण्यासहकोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले.
.jpg)