Top News

मुलीच्या शिक्षणासाठी सायकल भेट

 हेरले / शिवार न्यूज नेटवर्क : 

घर आणि शाळेतील अंतर हे मुलीच्या शिक्षणावर विपरित परिणाम करणारे ठरू नये या उद्देशाने कोल्हापूर येथील दानशूर व्यकतीमत्व व हॉटेल २४ K चे मालक राजेश करंदीकर मोहन पाटील संदीप सोनवलकर यांनी सायकल भेट दिली .

            नागाव (ता. हातकणंगले) येथील सुजाता कुंभार ही मुलगी आपल्या शेतमजूरआई वडिलांसह गावाबाहेर , शेतात राहतात . तीने दहावीचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून कोल्हापूर येथे महाविद्यालयात प्रवेश घेतला . पण तीला शेतातल्या घरापासून ते के . एम . टी . बस पकडण्यसाठी दररोजसुमारे पाच ते सहा किमी चे अंतर पायपीट करित जावे लागत होते. त्यामुळे तीचा वेळ वाया जाऊ नये व शिक्षणावर परिणाम होऊ नये तसेच तीला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने तीला सायकल भेट देण्यात आली.

          यावेळी माजी सरपच सतिश कुमार चौगुले , जयवंत चौगुले (अतिग्रे ), बाळासो थोरवत , माजी उपसरपंच सुरेश कांबरे , अविनाश पाटील ,गंगाराम कुंभार , ओंकार चौगुले , विनोद सौदे ' शुभम घुगरे , यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.



आई वडील शेतमजूर असल्याने सायकल घेण्याची सुद्धा माझी परिस्थीती नव्हती दररोज पाच ते सहा किमी पायपीट करित मी के एमटी पर्यत पोहचत असे. आशा अडचणीच्या काळात मला सायकल दिल्याने माझा वेळ व शिक्षणाची चागली सोय झाली .

        सुजाता कुंभार, विद्यार्थीनी 

थोडे नवीन जरा जुने