Top News

जनावरांमधील लंम्पी त्वचा रोगाबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहवे : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले आदेश

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनावरांमधील लंम्पी त्वचारोगाचा संसर्ग वाढताना दिसत आहे, शिरोळ तालुक्यात सध्या 15 जनावरांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत, या जनावरांच्या मध्ये दिसणाऱ्या या लक्षणांनंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत, तरी परंतु शासनाच्या तालुका पशुसंवर्धन विभागाकडील पशुवैद्यकीय विभागाने याबाबत पशुधन मालकांच्या मध्ये जनजागृती करून या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे आदेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले, त्यांनी सोमवारी जयसिंगपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यास भेट देऊन शासनाच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी आणि संबंधित डॉक्टरांशी विस्तृतपणे चर्चा केली, जनावरे चारा पाणी कमी खाणे, ताप येणे डोळ्यातून नाकातून चिकट स्त्राव येणे, जनावरांच्या अंगावर दहा ते वीस मि.मी. च्या गाठी उठणे, दूध कमी देणे, तर काही जनावरांमध्ये पायाला सूज येऊन लंगडणे अशी लक्षणे या रोगांमध्ये जाणवतात,लंपी या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव डास, गोचीड, चावणाऱ्या माशा, बाधित जनावरांचा स्पर्श व दूषित चारापाणी यापासून होतो असे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेतकऱ्यांनी याबाबत दक्ष रहावे व आपल्याकडील जनावरांमध्ये अशी लक्षणे दिसल्यास तातडीने पशुवैद्यकीय डॉक्टरांशी व शासनाच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असेही सांगितले, जनावरांमध्ये दिसणारा हा त्वचारोग गाईंमध्ये मोठ्या प्रमाणात येतो म्हैशींना यांची लागण कमी प्रमाणात होते,

तरीही शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, शिरोळ तालुक्यामध्ये सध्या 25000 वर गाई आहेत यांना लवकरच लसीकरण केले जाईल शासनाकडून लस उपलब्ध करून देण्याबाबत डॉक्टर शिंदे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे विनंती केली. यावर आमदार यड्रावकर यांनी वरिष्ठ पातळीवर तातडीने लस उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांना आदेश दिले, जनावरांमधील या त्वचारोगाची माणसाला प्रादुर्भाव होण्याची शक्यता जरी कमी असली तरी सुद्धा शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी अशा बाधित जनावरांना हाताळताना अथवा दूध काढताना मास्कचा व हॅन्ड ग्लोजचा वापर करावा, नंतर हात स्वच्छ साबणाने धुवावेत, बाधित जनावरांचे दूध उकळल्याशिवाय पिऊ नये असेही यावेळी डॉक्टर शिंदे यांनी सांगितले,

बैठकीस गटविकास अधिकारी शंकर कवितके, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर कुरुंदवाडे यांच्यासह पशुसंवर्धन विभागाकडून डॉक्टर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने