Top News

लम्पी आजाराबाबत हेरवाडमधील खिल्लार प्रेमी जनजागृती करणार

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 सध्या संपूर्ण राज्यात धुमाकुळ घातलेल्या लप्मी आजारामुळे सर्व पशुपालक शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे, या पार्श्वभूमीवर शासनाच्या वशुवैद्यकिय विभागाने जनजागृती तसेच विविध उपक्रम राबवून या आजाराची जनजागृती तसेच विविध उपाययोजना राबविण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेतले आहे, पशुवैद्यकिय विभागाच्या माध्यमातून हेरवाड येथील खिल्लार ग्रुपच्या वतीने देशी गाई, बैलांची लम्पी या आजारापासून बचाव व्हावा यासाठी जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आली असल्याची माहिती खिल्लार प्रेमी ग्रुपचे प्रमुख किशोर गायकवाड यांनी दिली.

लम्पी या रोगाचा सामना करण्यासाठी विविध घरगुती उपायाबरोबर जनावरांची सुरक्षा कशी करावी याचबरोबर शर्यती, जनावरांचा बाजार यासह विविध बाबी पाळून शासनाच्या या जनजागृतीसाठी खिल्लार प्रेमी गु्रप पुढाकार घेतला आहे. या अगोदरही खिल्लार प्रेमी ग्रुपच्या वतीने देशी गाई, बैल टिकविण्यासाठी विविध उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, याचाच भाग म्हणून खिल्लार प्रेमीचे प्रमुख किशोर गायकवाड यांनी शासनाच्या जनजागृतीचे काम हाती घेतले असून लंम्पी आजारापासून प्रत्येक गाय व बैल वाचला पाहीजे यासाठी ते ग्रुपच्या माध्यमातून काम करीत आहेत, पशुवैद्यकिय डॉक्टरांच्या सल्ल्याने पशुपालकांना सूचना व काळजी घेण्याचे आवाहनही या ग्रुपच्या माध्यमातून सुरु असल्याचे किशोर गायकवाड यांनी सांगितले. 


थोडे नवीन जरा जुने