सुरेश कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिकावरील धान्य तात्काळ मिळावे, दुबार शिधापत्रिका त्वरित मिळावी, काही गावांमधील पिकासंदर्भात अंतिम पैसेवारी 45 पैसे करावे, ज्येष्ठ नागरिकांना २१ हजार रुपये पर्यंतचे दाखले देण्यात यावे, या मागणीसाठी स्वराज्य क्रांती जनआंदोलनच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालय समोर सलग तीन दिवस सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन बुधवारी मागे घेण्यात आले, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार योगेश जमदाडे व पुरवठा निरीक्षक अरुण माळगे यांनी दुबार शिधापत्रिका देणेबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल असे सांगून अन्य मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली , त्यामुळे आंदोलकांनी तिसऱ्या दिवशी आंदोलन मागे घेतले,
स्वराज्य क्रांती जनआंदोलन संघटनेच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू होते, बुधवारी दुपारी तहसील कार्यालयाचे अधिकाऱ्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले, यावेळी नायब तहसीलदार जमदाडे व पुरवठा निरीक्षक माळगे यांच्यासह शासकीय अधिकारी आणि आंदोलक यांची बैठक झाली, या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन आंदोलन स्थगित करण्यात आले,
या आंदोलनात स्वराज्य क्रांती जन आंदोलन महिला आघाडी प्रमुख मेघा भतगे, आदम मुजावर , कैलास काळे, संतोष शिंगाडे ,गजानन पवार, मुजाहिद पटेल ,राजेंद्र प्रधान ,समीर पटेल, आप्पासाहेब बंडगर ,सतीश भंडारे ,सुनील कुरुंदवाडे, शंकर जाधव, बाळासाहेब कांबळे, अब्दुल बागवान,राजू बनपट्टी, सुनील भोसले, दगडू माने , भरत ढाले, सतीश कुरणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला,
