Top News

उद्या हेरवाडमध्ये हातात बैल धरून पळविण्याच्या स्पर्धा

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क

खिल्लार प्रेमी, वाश्या बैजा प्रेमी व एकता युवा ग्रुपच्या वतीने राहूल पाटील, आदमअली नदाफ, ओंकार माळी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवारी सकाळी १० वाजता हेरवाड येथील एकता चौकात हातात बैल धरून पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खिल्लार प्रेमी ग्रुपचे प्रमुख किशोर गायकवाड यांनी दिली. 

देशी गाई - बैलांचे महत्व सर्वांना पटावे आणि कमी होत असलेली बैलांची संख्या वाढावी यासाठी खिल्लार प्रेमी, वाश्या बैजा प्रेमी ग्रुप कायमच प्रयत्नशिल असतो. याचाच एक भाग म्हणून येथील एकता चौकात हातात बैल धरून पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकास २००१ व निशान, द्वितीय क्रमांकास १५०१ व निशान, तृतीय क्रमांकास १००१ व निशान अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यासाठी प्रवेश फी ३०० रुपये ठेवण्यात आलेली आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी राहूल गायकवाड (8999681103) आयाज मुल्ला (8551980265) यांच्याशी संपर्क साधावा. या स्पर्धेसाठी किशोर गायकवाड, कलंदर जमादार, शंकर पुजारी यांचे सहकार्य लाभले आहे.



थोडे नवीन जरा जुने