Top News

शिरोळ येथे चित्रपट निर्माते ,अभिनेते महादेव शिरोळकर यांचा सत्कार

 दत्त उद्योग समूहाच्यावतीने ड्रीम शॉर्ट फिल्मसह सर्व कलाकारांचे कौतुक 

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

झी मराठी ,कलर्स व स्टार प्रवाह यासह विविध टीव्ही चॅनेलवरील सिरीयलमध्ये विविध  भूमिका साकारलेबद्दल तसेच ओम तेजा प्रॉडक्शनच्या वतीने " ड्रीम " या सामाजिक विषयावरील शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय 3 पुरस्कार मिळालेबद्दल शिरोळ येथील निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता महादेव शिरोळकर ( शिरोळ) यांचा शिरोळ येथील श्री दत साखर कारखाना उद्योग समूहाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

         येथील दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर दतचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते कराड येथील अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेलीब्रेटी म्हणून शिरोळकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन गणपतराव पाटील यांनी अभिनेते महादेव शिरोळकर यांच्या बॉलीवूड, हॉलीवुडच्या वाटचाली बाबत कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     यावेळी महादेव शिरोळकर म्हणाले, कला क्षेत्रातील आयुष्याच्या प्रवासात लघु चित्रपट व सिरीयल यामध्ये अनेक भूमिका साकार केल्या, ऐतिहासिक परंपरा लाभलेली शिरोळनगरी ही माझी जन्मभूमी आहे. या जन्मभूमीत, गावच्या मातीमधील झालेला सन्मान कदापिही विसरणार नाही, दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांनी कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन व ऊर्जा दिली असूूून शिरोळमधील सन्मानामुळे मी खूप आनंदी झालो,असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी नाट्य - सिनेअभिनेते दगडू माने, कलाविश्व रंगभूमी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान, उदय शिरोळकर, दत्तात्रय कोरे, जानकी वृध्दाश्रम चे प्रमुख बाबासाहेब पुजारी, शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा , ए.एस पाटील यांच्यासह अधिकारी ,कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने