नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क
शिरोळच्या कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशन यांच्यावतीने दै.लोकमतचे कुरुंदवाड प्रतिनिधी गणपती कोळी यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अशोकराव माने, चिमासाहेब जगदाळे कॉलेजचे मुख्य विश्वस्त धनाजीराव जगदाळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरोळ येथील कलाविश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने येथील चिमासाहेब जगदाळे कॉलेज सभागृहामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध गुणीजनांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट पत्रकार म्हणून युवराज पाटील (सकाळ), विनोद पुजारी (पुढारी), महेश पवार (महान कार्य) यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर आदर्श समाजरत्न पुरस्काराने सुरेश सासणे, विश्वास बालिघाटे, वीरस्वामी तूपदळे, कर्तवनिष्ठ पुरस्काराने रोहित डावाळे, अमर फडतारे, कृषीभूषण पुरस्काराने राजकुमार नकाते, आदर्श शिक्षकरत्न दत्तात्रय आंधळे यांना गौरवण्यात आले
यावेळी नवे पर्व या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाला. प्रारंभी सामुदायिक राष्ट्रगीत संपन्न झाले. या कार्यक्रमात कलाविश्वभूमी संस्थेचे संस्थापक दगडू माने यांनी स्वागत करून मान्यवरांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते माहिती अधिकार मार्गदर्शक शाहीन शेख यांनी माहिती अधिकाराबाबत परखड विचार मांडले. यावेळी प्रशासकीय महाविद्यालयाचे संचालक बाबासाहेब आरसगोंडा, विनोद पुजारी, दत्तात्रेय आंधळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कला विश्व रंगभूमी व सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान, राजेंद्र दाभाडे, कृष्णा लोहार, खंडेराव हेरवाडे, रावसाहेब भोसले, डॉ शंकर कुंभार, नगरसेवक एन. वाय. जाधव यांच्यासह मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावसाहेब भोसले यांनी आभार मानले. कु. ऋचा माळकर यांनी सूत्रसंचालन केले.
