हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
इचलकरंजी येथील मैत्री फौंडेशनच्या वतीने शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याच्या कुटूंबियांना दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
इचलकरंजी येथील मैत्री फौंडेशन कायमच सामाजिक कामात अग्रेसर असते, हेरवाड येथील आत्महत्याग्रस्त शेतकर्याचे पीक कर्ज फेडण्यातही या फौंडेशनचे मोलाचे योगदान आहे. एवढ्यावरच न थांबता या फौंडेशनच्या वतीने या कुटूंबाला दोन महिने पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देवून सामाजिक बांधिलकी जोपासली यासाठी या फौंडेशनच्या अध्यक्षा वहिदा नेजकर, चंद्रप्रकाशजी छाजेर यांचे सहकार्य लाभले, यावेळी तंटामुक्त अध्यक्ष बाबुराव माळी उपस्थित होते.
