Top News

कोरवी समाजाबांधवांच्या पाठीशी मी ठामपणे ः तानाजी आलासे

 कोरवी समाजाबांधवांच्या पाठीशी मी ठामपणे ः तानाजी आलासे

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

कोरवी समाज ओंकार गणेशोत्सव मंडळाच्या नूतन अध्यक्षपदी येथील योगेश यशवंत कोरवी याची एकमताने निवड करण्यात आली. या निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कुरुंदवाड शहराध्यक्ष तानाजी आलासे, कोरवी समाजाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार माने यांनी त्यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना तानाजी आलासे म्हणाले, कोरवी समाजाचा विकास होण्यासाठी समाजातीलच तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे. समाजातील तरुणांनी आपला प्रश्न सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा देणे गरजेचे आहे, यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर राहू असे सांगितले.

यावेळी बोलताना विजयकुमार माने म्हणाले, समाजातील तरुणांनी आता एकजुट होणे गरजेचे आहे, समाजाच्या हितासाठी समाजबांधवांनी आता शांत न बसता आपल्या समस्या सोडविण्यासाठी पुढे येवून आपली एकजुट दाखविणे गरजेचे असल्याने कोरवी समाजाच्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटीबध्द असल्याचे सांगितले.

यावेळी जेष्ठ समाजसेवक बिरू गावडे, आण्णाप्पा कोरवी, सूरज कोरवी, रणजीत कोरवी, सुशांत कोरवी, विशाल कोरवी, अक्षय कोरवी, साहिल कोरवी यांच्यासह समाजातील तरुण मोठ्यासंख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने