Top News

छायाचित्रकारांनी कधीही स्वतःला कमी समजू नये : डॉ. शंकर कुंभार

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क

     संपूर्ण जगभर आज जागतिक छायाचित्रकार दिन उत्साहात संपन्न केला जातो शिरोळ तालुक्यातील शिरोळ तालुका फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स सहकारी संस्था मर्यादित जयसिंगपूर यांच्या वतीने मराठा मंडळ हॉल जयसिंगपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात जागतिक छायाचित्र दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर अशा वेगवेगळ्या शहरातून अनेक फोटोग्राफर यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्री डॉ. शंकर कुंभार (अण्णा) देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, प्रमुख अतिथी चंद्रकांत जाधव (उपाध्यक्ष मराठा महामंडळ) पाहुण्यांनी बोलताना सर्व फोटोग्राफर यांना जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या कुंभार अण्णा बोलताना म्हणाले या जगामध्ये कोणताही कार्यक्रम फोटोग्राफर यांच्या विना अपुरा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमांमध्ये फोटोग्राफरचे स्थान अतिशय महत्त्वाचे मानले जाते, कोणताही कार्यक्रम फोटोग्राफर शिवाय केला जात नाही, त्यामुळे छायाचित्रकारांनी कधीही स्वतःला कमी समजू नये, अतिशय उत्साहामध्ये सकारात्मक विचारांनी आपण पुढचे पाऊल उचलावे, इथून पुढे तुमच्या संस्थेला कसलीही मदत लागली तर मी नेहमी तुमच्या संस्थेसोबत असेन असे आश्वासन देऊन त्यांनी जागतिक छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

   या कार्यक्रमासाठी सांगलीतील द सन आर्ट स्टुडिओ यांचा कॅमेरा, अल्बम, फोटोग्राफर यांना  आवश्यक साहित्याचा स्टॉल, इंचलकरंतील उत्सव कलर लॅब यांचा वेगवेगळ्या अल्बम व्हरायटी चा स्टॉल, जयसिंगपूर  मधील गुरव प्रेम यांच्या वतीने वेगवेगळ्या नवीन फ्रेम,फोटो फ्रेम व्हरायटी वेगवेगळ्या अकराच्या फ्रेमचा स्टॉल, सुशांत मेत्रे या युवा फोटोग्राफरच्या कडून अल्बम डिझायनिंग सॉफ्टवेअर चा स्टॉल लागलेला होता, 

    या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात इंचलकरंजी कॅप्चर क्लब च्या पदाधिकाऱ्यांनी येऊन फोटोग्राफर यांना मार्गदर्शन केले, मोटिवेशनल स्पीकर युवा उद्योजक महेश कांबळे साहेब यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केले पोस्ट खात्यातील कर्मचारी श्री. विशाल ठोंबरे यांनी  येऊन 399 रुपये मध्ये मिळणारा विमा यावर मार्गदर्शन केले. आमच्या संस्थेचे अध्यक्ष अशोक घोरपडे साहेब यांनी उपस्थित मान्यवरांचा स्वागत केलं व संपूर्ण तालुक्यातील छायाचित्रकारांना छायाचित्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू सावंत यांनी केले, कार्यक्रमाचे आभार धनंजय पाटील यांनी मानले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीहरी माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी स्मार्ट लॅबचे मालक राजू शेख साहेब, यशवंत डिजिटल कलर लॅब चे मालक जगदीश पाटील, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व संचालक श्री. सुरेश मेंगे, श्री.आदिनाथ शिरगावे, श्री.विलास माळी, श्री.मोहन मानगावे,श्री. अभिजित गुरव, श्री शशिकांत चौगुले सर्व फोटोग्राफर, फोटोग्राफर मित्र, बंधु, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने