Top News

पदवीधरांना प्रॅक्टिकल बँकिंगच प्रशिक्षण गरजेचं : गौतम कोतवाल

 पुणे / शिवार न्यूज नेटवर्क :

 कुठल्याही शाखेतील पदवीधराला बँकिंग क्षेत्रातील प्रॅक्टिकल कामाच प्रशिक्षण देणं ही काळाची गरज आहे. सध्या प्रचलित असलेल्या अभ्यासक्रमात बँकिंग बाबत अतिशय तोकडं ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जातं. त्यामुळे बँकिंग क्षेत्रात प्रत्यक्ष काम करताना त्यांचे हे ज्ञान अपूर्ण पडतं. असे उद्गार बँकिंग क्षेत्रातील तज्ञ गौतम कोतवाल यांनी ग्रीन वर्ल्ड क्लब आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गात व्यक्त केल. ग्रीन वर्ल्ड क्लब गेली वीस वर्ष युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे.यासाठी एक हजार

उद्योजकांच्या यशोगाथा तरुणांपर्यंत पोचवल्या आहेत. यातून त्यांना त्यांनी केलेल्या खडतर प्रवासाचा परिचय करून दिला जातो. बँकिंग क्षेत्रातील नोकरीच्या संधी या विषयावर ग्रीन वर्ल्ड चे संचालक कुमार अनवेकर यांनी आयोजित केलेल्या शिबिरास ज्येष्ठ बँकिंग तज्ञ प्रदीप वैद्य यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन केलं. बँकेमध्ये नोकरी मिळवायची असेल तर त्यासाठी त्यांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणं हे गरजेचे आहे. ग्रीन वर्ल्ड क्लब स्टडी सर्कल विभागाने सध्या ग्रॅज्युएट मुलांसाठी प्रॅक्टिकल बँकिंग प्रशिक्षणाचा वर्ग सुरू केल्या बाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली. ज्या लोकांना प्रॅक्टिकल बँकिंग प्रशिक्षण घेऊन डायरेक्ट बँकेमध्ये काम करण्याची इच्छा आहे, अशा पदवीधरांना या कोर्समध्ये प्रशिक्षण दिलं जातं. कुठल्याही शाखेतील पदवीधरांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन आपलं बँकिंग करिअर सुरू कराव असं मत याप्रसंगी बोलताना त्यांनी व्यक्त केल. याप्रसंगी कुमार अनवेकर बोलताना म्हणाले कुठल्या ही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रातील परिपूर्ण ज्ञान हे गरजेचे आहे. त्या क्षेत्रातील आपली गुणवत्ताच आपल्याला यश प्राप्त करून देते. या कार्यक्रमासाठी ज्योती भापकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रसिका तुळजापूरकर यांनी केला.

थोडे नवीन जरा जुने