इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क
सदृढ व निरोगी पिढी घडवण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे असे मत शिरोळच्या तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांनी व्यक्त केले. त्या कृषी दिनानिमित्त दत्तवाड तालुका शिरोळ येथे लठ्ठे एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ बाबगोंडा देवगोंडा पाटील कृषी तंत्र विद्यालय व दिवाण बहादुर लठ्ठे फाउंडेशन अमेरिका व बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवानबहादूर अण्णासाहेब लट्ठे सेंद्रिय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली चे सेक्रेटरी सुहास पाटील हे होते. त्यापुढे म्हणाल्या की, आज शेतकरी पूर्णपणे व्यावसायिक झाला आहे त्यामुळे आपली आर्थिक घडी बसवण्यासाठी पूर्वापार चालत आलेल्या आपल्या संस्कृतीची जडणघडण विसरून जागतिक स्पर्धेत उतरला आहे यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खते कीटकनाशके तणनाशके आदींचा मारे माप वापर सुरू आहे त्यामुळे जमिनीचा पोत घसरला आहे. शिवाय अशा उत्पादनातून मोठ्या प्रमाणात विष युक्त अन्नधान्य उत्पन्न होत आहे त्यामुळे याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन विविध गंभीर आजार उद्भवू लागले आहेत. परदेशातील शेतकरी जमिनीत कोणतीही पिके घेण्यापूर्वी जमिनीचा पूर्ण अभ्यास करून गरज असलेल्या अन्नद्रव्याचा जमिनीला पुरवठा करतो मात्र आपल्याकडील शेतकरी जमिनीचा अभ्यास न करताच केवळ भरघोस उत्पादन हे एकच ब्रीद लक्षात ठेवून नको असलेले अनेक विषारी घटक जमिनीला देत आहे. यासाठी वेळीच जागरूक होऊन जमिनीचा पोत व सुपीकता चांगले राहण्यासाठी तसेच पौष्टिक अन्नासाठी सेंद्रिय शेती अंगीकारणे गरजेचे बनले आहे.
याप्रसंगी शाहू कृषी तंत्र विद्यालय कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर के व्ही गुरव तसेच प्राचार्य शांतीकुमार पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ही करण्यात आला.
याप्रसंगी हेमंत लठ्ठे, आशिष लठ्ठे, सुकुमार बेळंके, चंद्रकांत पाटील सर, गजकुमार माणंगावे, शाळा समिती चेअरमन अरुण पाटील, दीपक पाटील, सुनील चौधरी, अजित चौगुले, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुकुमार सिद्धनाळे, गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले, विरूपाक्ष हेरवाडे, तलाठी इकबाल मुजावर, पोलीस पाटील संजय पाटील, शितल नेजे, प्रकाश वठारे आदीसह दतवाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य सुमंत लाड, सूत्रसंचालन प्रा. एस.टी पाटील यांनी केले तर आभार एस सी कोळी यांनी मांडले.
