जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
जयसिंगपूर येथे मोटरसायकल चोरणार्या दोघांना पोलिसांनी जेरबंद करुन त्यांच्याकडून 30 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, जयसिंगपूर येथे दि.19 जून रोजी मोटरसायकल चोरीचा गुन्हा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता, या अनुषंगाने तपास सुरु असताना जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल रोहीज डावाळे यांना गोपनिय खबर्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील शेखर चंद्रकांत आंबी, संतोष रामाण्णा गडदे यांना ताब्यात घेवून तपास केला असता त्यांनी मोटरसायकल चोरीची कबुली दिली, त्यानंतर त्यांच्याकडून चोरलेली 30 हजार रुपये किंमतीची मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस नाईक सुरेश तोडकर, पोलिस कॉन्स्टेबल संदेश शेटे, पोलिस कॉन्स्टेबल संदेश शेटे, पोलिस कॉन्स्टेबल राहीत डावाळे, होमगार्ड मिलन शिंगाडे, हुसेन जतकर यांनी केली.
