कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची अर्थवाहिनी असलेली दि प्राथमिक शिक्षक बँकेसाठी झालेल्या ९७.७३% इतक्या विक्रमी मतदान झाले.
सदर निवडणुकीसाठी तीन पॅनेल उभे करणेत आले होते.गेले पंधरा दिवसापासून प्रचार यंत्रणा राबविणेत आली होती. तिन्ही पॅनेलकडून विजयाची खात्री देत आहेत.
शिक्षक बँकेच्या निवडणुकीत चुरशीची तिरंगी लढत होत आहे. शिक्षकसंघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघ सत्तारूढ पॅनेल, पुरोगामी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली 'आप'लं पुरोगामी- समविचारी परिवर्तन पॅनेल तर थोरात गटाच्या शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रवीकुमार पाटील, समितीचे नेते जोतिराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजश्री शाहू स्वाभिमानी शिक्षक आघाडी या पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे.
प्रचार काळात आरोप-प्रत्यारोप, शह-काटशाहाचे राजकारण झाले आहे. तिन्ही पॅनेलने थेट शिक्षक सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक तालुक्यात शिक्षक मेळावे घेऊन भूमिका मांडली. दरम्यान, सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी होणार आहे.
