तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
तेरवाड ता.शिरोळ ग्रामपंचायतीने हेरवाड पॅटर्न राबवत विधवा प्रथा बंद ठराव करून क्रांतीकारी व पुरोगामी विचारातून अनिष्ट प्रथेविरुद्ध ठराव ग्रामसभेमध्ये मंजूर केले. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने विधवा प्रथा बंद असा कायदा करावा असे परिपत्रक काढले आहे. या सरकारी आदेशानुसार अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने केला.
तेरवाड ग्रामपंचायत सभागृहात आज शुक्रवारी विधवा प्रथा बंदी या एकमेव विषयावर मासिक सभा बोलविण्यात आली होती.अध्यक्षस्थानी सरपंच सुगंधा वडर होत्या. ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर यांनी विषय वाचून दाखवला ग्रा.प सदस्या हर्षवर्धना भुयेकर यांनी या विषयाचा ठराव संमत करावा असे सुचवले तर शशिकला वाडीकर यांनी त्याला अनुमोदन दिले.
यावेळी बोलताना उपसरपंच जालिंदर शांडगे म्हणाले विधवा प्रथा बंदीच्या ठरावाचे परिपत्रक वरिष्ठ कार्यालयात सादर करून महिला सबलिकरणाच्यादृष्टीने खास.धैर्यशील माने, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नवीन व्यावसायिक योजना आणि महिला औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे.त्यासाठी व्यापक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी संजय अणुसे, लक्ष्मीबाई तराळ,पोर्णिमा गोंधळी,शोभा आवळे लक्ष्मी घटनटे.शाबगोंडा पाटील,म्हादगोंडा पाटील आदी उपस्थित होते.
.jpg)