Top News

हेरवाडमध्ये शिक्षक परिवारामार्फत " गुरुमंत्र यशाचा " उद्बोधन कार्यक्रम संपन्न


 हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

          हेरवाडमध्ये शैक्षणिक जागृती निर्माण व्हावे या उद्दात हेतूने प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक एकत्र येवून शिक्षक परिवार निर्माण करुन शैक्षणिक उपक्रमांची सुरूवात केली. हेरवाड पॅटर्नचे शिल्पकार -सरपंच सुरगोंडा पाटील,शैक्षणिक कार्यात अनमोल योगदान देवून सेवानिवृत्त झालेले प्रा. शिवगोंडा पाटील यांचा सत्कार करणेत आला. प्रमुख पाहुणे -माणिक नागावे मुख्याध्यापिका हेरवाड हायस्कूल, श्री.सुभाष तराळ - मुख्याध्यापक कन्या विद्या मंदिर हेरवाड, कुमार शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक- श्री.रविंद्र सिदनाळे उपस्थित होते.

      "गुरुमंत्र यशाचा" हा श्री.अजित पाटील यांचे उद्बोधनपर व्याख्यान संपन्न झाले. "विद्यार्थ्यांनो स्वप्ने पहा, आपले भविष्य घडविण्यासाठी तयार व्हा. तेजस जोंधळे, कु.भूमिका मोहिते यांचे सारखे आपलेही नाव व्हावे. अशी महत्वांकाक्षा ठेवा. सुप्त भावनांचा विकास करण्यासाठी शिक्षक परिवार प्रयत्न करीत आहेत त्याचा अवश्य लाभ घ्यावा. स्वतःला कमी लेखू नका. आर्थिक परिस्थिती कशीही असो तुम्ही स्वप्ने पाहण्याचे सोडू नका शिक्षक परिवार आपले सोबत आहे. 

       प्रमुख पाहुण्या माणिक नागावे म्हणाल्या -''ज्या उद्दात हेतूने शिक्षक परिवार स्थापन करून उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यासाठी शुभेच्छा. नेहमी सकारात्मक विचार ठेवा, पाहण्याचा दृष्टिकोन ठेवा, चांगले विचार ठेवा. कोणतीही गोष्ट अशक्य नाही."असे प्रतिपादन केले. प्रा.शिवगोंडा पाटील सर म्हणाले, ''विद्यार्थांच्या उपस्थितीमुळेच हा कार्यक्रम संपन्न झाला. यासाठी शिक्षक परिवारातील सदस्यांनी प्रयत्न केले. संधीचे सोने कसे करावे?हे आपल्या परिवारांनी दाखवून दिले. कुमार शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. रविंद्र सिदनाळे म्हणाले, " हेरवाड ग्रामपंचायतीचे नाव आज गाजत आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिक्षक परिवाराने ज्या उद्दात हेतूने जे कार्य करतील त्याचा उपयोग करुन घ्या. शिक्षक परिवारालाही हार्दिक शुभेच्छा. अध्यक्षीय भाषणात सरपंच -सुरगोंडा पाटील म्हणाले," पूर्वीच्या काळी मार्गदर्शन करण्यासाठी कोणी पुढे मिळत नव्हते पण आज शिक्षक परिवार पुढाकार घेवून कार्य करीत आहेत. त्यांना सदैव ग्रामपंचायत सहकार्य करील. आतापर्यंत शैक्षणिक संस्थांना भौतिक सुविधाही पुरविणेत आलेल्या आहेत. या प्रसंगी सुभाष तराळ,बाबालाल बाणदार, किरण पाटील,विलास कडते, संदिप परीट,अशोक माळी,श्रीशैल नेर्ले,बिरु देबाजे,अमोल देसाई,शंकर बरगाले, लोंढे मॅडम, कालेकर मॅडम यांचेसह विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रकाश कांबळे तर सूत्रसंचालन -दिलीप शिरढोणे सर यांनी केले.

थोडे नवीन जरा जुने