कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
दि प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंक कोल्हापूरच्या बहुचर्चित पंचवार्षिक निवडणुकीत उर्दू शिक्षक संघटनेकडून तीन उमेदवारी अर्ज दाखल करणेत आले. महिला राखीव मधून सौ. जकीया मोज्जम चौगले, इतर मागास प्रवर्गातून तौफिक अब्दुलकरीम मोमीन तर सर्व साधारण प्रवर्ग हातकणंगले तालुकयामधून उस्मान पटेल यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी महमदहनिफ मुल्ला,मोज्जम चौगले,इक्बाल पटेल,शकील पिरजादे,सुहेल पटेल,जुनेद कोल्हापूरे,रियाज भेंडवाडे,इरफान भेंडवाडे,अंजरशा पटेल इत्यादी सभासद उपस्थित होते.
