Top News

कुरुंदवाड : त्रिमूर्ती वाघेला यांची माघार

 मुख्याधिकारी, कर्मचाऱ्यांवर गैरसमजातून आरोप केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क -

कुरुंदवाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव व कर्मचाऱ्यांविरुद्ध सर्व आरोप मी गैरसमजातून केले होते, ते आरोप माघार घेत असल्याचे पत्र महिला सफाई कामगार त्रिमूर्ती वाघेला यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुरुंदवाड यांना पाठविले आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात त्रिमूर्ती वाघेला यांनी म्हटले आहे की, दि. २८ मे २०२२ रोजी मी कुरुंदवाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच अन्य कर्मचाऱ्यांवर आरोप करणारा तक्रार अर्ज दिलेला आहे. या अनुषंगाने कुरुंदवाड पोलिस स्टेशनला संबधीत प्रकरणी चौकशी सुरु आहे. तथापी सदर अर्जानुसार मी केलेले सर्व आरोप हे गैरसमजूतीमुळे केलेले असून आता माझा गैरसमज दूर झालेला आहे. मुख्य अधिकारी निखिल जाधव अथवा अन्य कर्मचारी विक्रम हेगडे, अमोल कांबळे, पुजा पाटील, प्राची पाटील तसेच सुनिल माळी यांच्या विरुध्द मी केलेल्या तक्रारी गैरसमजामुळे व भावनेच्या भरात केलेल्या आहेत. माझी दिशाभूल करण्यात आली होती. माझी या लोकांविरुध्द कसलीही तक्रार नाही. मी यापूर्वी दाखल केलेले जातीवाचक शिवीगाळ, लज्जास्पद वर्तन, भ्रष्टाचार इत्यादी सर्व अर्ज व पत्रकार परिषदेत केलेले सर्व आरोप मागे घेत असून याबददल माझ्यावर कोणाचाही कसलाही दबाव नाही. काही लोक माझ्या तक्रारीचा गैरफायदा घेवून राजकारण करीत आहेत. त्यामुळे मी सदरचा माझा तक्रारी अर्ज मागे घेत असून माझ्यावर अथवा माझे कुटूंबावर कुणीही दबाव आणलेला नाही. तरी सदरच्या अर्जान्वये माझा तक्रारी अर्ज निकाली काढणेत यावा अशी विनंती वाघेला यांनी केली आहे. दरम्यान, त्रिमूर्ती वाघेला यांनी गैरसमजातून आरोप केले होते. ते सर्व आरोप मागे घेत आहे. ७ जून रोजी त्रिमूर्ती वाघेला यांनी एका पत्राद्वारे माघार घेतली आहे. 

थोडे नवीन जरा जुने