कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :
भारताचे जागतिक पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करणारे, पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यकाळास ८ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस जी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील व भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांच्या आदेशानुसार भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर ग्रामीण ची 'विकास तीर्थ बाईक रॅली'चे आयोजन मंगळावर दि ७/०६/२०२२ रोजी करण्यात आले होते. सदर विकास तीर्थ रॅली राजश्री शाहू महाराज जन्मस्थळ येथे अभिवादन केले,यावेळी भाजप संघटन सरचिटणीस नाथाजी पाटील,विठ्ठल पाटील यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करून दिली.
या प्रसंगी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर,प्रदेश सचिव अलकेश कांदळकर,जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव,युवा वॉरियर जिल्हा संयोजक डॉ अरविंद माने,जिल्हा सरचिटणीस धीरज करलकर,अक्षय वरपे,अर्जुन पाटील,दगडू शेणवी,विशाल पाटील,सुरेश पाटील,अमोल पाटील,अमोल शिवई पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
