Top News

जिव्हाळा निर्माण करणारे नेतृत्व अरुणभाई दुधवडकर :आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर



शिवार न्यूज नेटवर्क

एकदा ओळख झाली नाते संबंध प्रस्थापित झाले तर ते नाते कसे सांभाळायचे व जिव्हाळा कसा वाढवायचा हे अरुण भाई दुधवडकर यांच्याकडून शिकायला मिळते असे उदगार सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी काढले शिवसेना नेते आणि कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर यांचा ताडदेव मुंबई येथे वाढदिवस संपन्न झाला त्यांना शुभेच्छा देताना राज्यमंत्री यड्रावकर बोलत होते,

नेहमी सामाजिक कामात प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका घेऊन अरुण भाई काम करत असतात त्यांच्या कामाची पोहोच आज झालेली गर्दी पाहताना ध्यानात येते असे सांगताना राज्यमंत्री यड्रावकर म्हणाले केवळ मुंबईतच नाही कोल्हापूर सांगली जिल्ह्यात सुद्धा अरुण भाई यांच्यावर प्रेम करणारा त्यांचा खूप मोठा लोकसंग्रह आहे असे सांगताना सच्चा शिवसैनिक कसा असतो हे अरुण भाई यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येते असेही मंत्री यड्रावकर म्हणाले यावेळी अरुण भाई यांचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी अभिष्टचिंतन केले आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मुरलीधर जाधव शिरोळ तालुका माजी शिवसेना प्रमुख सतीश मलमे मातोश्री ट्रस्ट अब्दुललाट चे प्रमुख डॉक्टर वृषभ चौगुले शिवसेना महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा संघटक मंगला चव्हाण महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख माधुरी ताकारे शिरोळ तालुका महिला आघाडी प्रमुख वैशाली जुगळे व जयसिंगपूर शहर प्रमुख साजिदा घोरी व मान्यवर उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने