Top News

संजय घोडावत शिक्षण संकुलात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

वैश्‍विक उष्णतेमध्ये होणारी वाढ, वातावरणातील बदल याचा गांभीर्याने विचार करून भावी पिढी सुस्थितीत जीवन जगावी या दूरदृष्टिकोनातून संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामार्फत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, प्राचार्य श्री.विराट गिरी, अकॅडमिक डीन डॉ. उत्तम जाधव, आय टीआय चे प्राचार्य प्रा. स्वप्नील ठीकणे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय बी कोंगे यांनीही वृक्षारोपण केले.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा.अजय बी कोंगे आणि विजय देसाई व टीम ने अथक परिश्रम घेतले.

या उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे कौतुक केले. 

थोडे नवीन जरा जुने