Top News

"शिक्षक परिवार हेरवाड मार्फत शालेय विद्यार्थ्यासाठी " गुरुमंत्र यशाचा"उद्बोधन कार्यक्रम"


हेरवाड / शिवार वार्ता न्यूज नेटवर्क : 

 हेरवाडमधील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण तयार व्हावे. अभ्यासाची आवड निर्माण व्हावी. या उद्देश्याने हेरवाडमधील प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन शिक्षक एकत्र येवून "शिक्षक परिवार" स्थापन केला आहे.

           शिक्षक परिवार, हेरवाड मार्फत शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करणेत येणार आहेत. मंगळवार दि.7 जून 2022 रोजी शिवशैल हॉल, संतुबाई रोड,हेरवाड येथे सकाळी 10 वाजता " गुरुमंत्र यशाचा '' हा श्री.अजित पाटील,हेरवाड यांचे मार्गदर्शन इयत्ता 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमांसाठी विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करणेत येत आहे. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. सुरगोंडा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हेरवाड हायस्कूल, हेरवाडच्या मुख्याध्यापिका माणिक नागावे,शिक्षक परिवार सदस्य,विद्यार्थी,पालक उपस्थित राहणार आहेत.

थोडे नवीन जरा जुने