हरोली / शिवार न्यूज नेटवर्क :
हरोली येथील गट नं ४२५ व ४२६ गटाचे दगड खाणीसाठी लिलावाचा प्रस्तावकामी मार्गदर्शन व समुपदेशन करण्यासाठी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात व शिरोळ तहसिलदार मा डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.ग्रामसभेच्या अध्यक्ष सरपंच सौ गीता कांबळे होत्या.यावेळी ग्रामसभेत नागरीकांनी गट नं ४२५ व ४२६ मध्ये दगडखाणीला विरोध दर्शवत विषय नामंजूर केला,त्याप्रमाणे प्रांतधिकारी यांनी खणीस विरोध आहे.नामंजूर असे ग्रामपंचायतीस प्रोसिडींग ठराव तयार करून पाठवण्यास सांगितले.त्यानुसार प्रोसिडिंग ठराव तयार करण्यात आला,यावेळी सर्कल अधिकारी विनायक माने,तलाठी जितेंद्र अहीरे,ग्रामसेवक सौ स्वाती शेळके,उपसरपंच नेमिनाथ चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सागर माने,बाळासाहेब कांबळे, महावीर चौगुले, मनिषा माने,जयश्री परीट तसेच गावातील सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षिय नेते व नागरीक,महिला उत्फुर्तपणे उपस्थित होते.
.jpg)