Top News

कोथळी येथे संभाव्य महापूर परिस्थितीची आढावा बैठक संपन्न

 


कोथळी / शिवार न्यूज नेटवर्क :

कोथळी ता.शिरोळ येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये संभाव्य महापूर २०२२ पूरस्थिती बाबत आढावा बैठक घेण्यात आली.ही बैठक सरपंच भरतेश खवाटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.महापूर आल्यानंतर घ्यावयाची काळजी त्याचबरोबर नागरिकांना बाहेर काढण्यासाठी लागणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे अहवान कर्मचारी व विविध अधिकारी यांना ग्रामविकास अधिकारी राहुल नाईक यांनी केले.त्याच बरोबर सरपंच भरतेश खराटे यांनी संभाव पूर परिस्थितीचा आढावा घेत कोथळी गावासाठी शासनाकडून होडीची मागणी करण्याचे यावेळी सुचविण्यात आले. त्याचबरोबर पूर पट्ट्यातील जी जी घरे धोकादायक आहेत त्या घरातील लोकांचे स्थलांतर व घर काढून घेण्याचे व त्या लोकांची नावे ग्रामपंचायत प्रशासनाला कळवण्याचे अंगणवाडी सेविका यांना सूचना देण्यात आले व महापूरवेळी गावात वायरमन पुर्णवेळ थांबणे, त्याचबरोबर खाली बुडत असलेले डी.पी.वर घेण्याचेही आदेश देण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना देऊन मराठी शाळा व मंगोबामाळ शाळा याठिकाणी स्थलांतरित होत असलेले पूरग्रस्तांना सामूहिक शौचालयाची मागणी करण्यात आली व त्याबद्दल सूचनाही देण्यात आल्या. त्याचबरोबर पूर ओसरल्यानंतर स्वच्छतेसाठी उपायोजना करण्यासाठी आवश्यक त्या सुचनाही देण्यात आल्या.

थोडे नवीन जरा जुने