Top News

नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे : पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

मौजै संभाजीपूर, जयसिंगपूर परिसरात घरफोडी, चेन स्नॅचींग तसेच मोबाईल संपर्क साधून ऑनलाईन पध्दतीने रक्कम हडप करणे यासारखे गुन्हे वाढले आहेत.पोलिसांनी अशा चोरट्यांना गजाआड करण्यासाठी तपास यंत्रणा गतीमान केली आहे. बदलत्या काळात नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन शिरोळचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी केले.संभाजीपूर येथे श्री माता सावित्रीबाई फुले गृहनिर्माण संस्थेस आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ अंबपकर,शिरोळ पोलिस ठाण्याचे बीट अंमलदार डी.एम. कुंभार, माजी उपसरपंच सौ. सुनिता चिखले प्रमुख उपस्थित होते.याप्रसंगी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी निरसन केले. गुन्हे रोखण्यासाठी नागरिकानीही पोलिसांना साथ द्यावी, असे आवाहन केले. याप्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन पांडुरंग चंदुरे, संचालक प्रा. साहेबराव लोंढे, प्रा. सागर बोराडे, श्रीनिवास जाधव, श्रीमती विजया गवळी, सौ. हौसाबाई मळगे, श्रीमती आकाशी भोसले, सौ. अलमास महात, सहदेव कांबळे, सातु पवार, मनोज वाघमारे, साजीद शेख, जयसिंग इरकल यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.आभार साहेबराव लोंढे यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने