इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
शरद कृषी महाविद्यालय जैनापूर येथील कृषिदूत प्रशिक्षणासाठी दत्तवाड येथे दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच चंद्रकांत कांबळे, उपसरपंच रूपाली पोवाडी, ग्रामसेवक संतोष चव्हाण त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
हे कृषिदूत शेती विषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान, कृषी जनजागृती करणे तसेच कार्यानुभव यांचा अभ्यास करणार आहेत. सहा महिने हा अभ्यासक्रम चालणार आहे. यावेळी कृषिदूत दीपक गावडे, प्रथमेश बिरनाळे, अमित घाडगे, शिवकुमार घोळवे व सुमित नामदे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, प्रा. संजय फलके व डॉ. रमेश कोळी यांचे मार्गदर्शन लाभले.
