इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :
अनिष्ठ विधवा परंपरेविरुद्ध गावसभेत बंदीचा सर्वप्रथम ठराव करणारे "हेरवाड पॅटर्नचे" जनक- गावचे सरपंच श्री. सुरगोंडा पाटील यांचा सत्कार जिजाऊ महिला नागरी सहकारी पतसंस्था व प्रथमेश एज्युकेशन सोसायटी इचलकरंजीमार्फत करण्यात आला.
कोविड कालावधीत मयत झालेल्या तरुणांच्या विधवा महिलांच्या वेदना जवळून पाहिलेल्या होत्या. त्यांच्यासाठी काहीतरी करावे. असा विचार सातत्याने येत होता. प्रमोद झिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वप्रथम विधवा बंदीचा गावसभेत निर्णय घेतला.यासाठी उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ, प्रसारमाध्यमे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.असे प्रतिपादन सरपंच श्री. सुरगोंडा पाटील यांनी केले.
यावेळी संस्थापक - श्री.अशोक कोळी,चेअरमन सौ.जया कोळी,संचालिका सौ.सुरेखा कुंभार,ग्राम पंचायत हेरवाडचे सदस्य श्री.सुकुमार पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्री.संजय पुजारी,श्री.दिलीप शिरढोणे यांनी मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेच्या व्हा.चेअरमन - सौ.शैलजा राजेंद्र पाटील,संचालिका- सौ.सुनंदा ठोमके,सौ.रेखा पाटील,सौ.वैशाली पाटील, सौ.प्रतिभा हिंगलजे,सौ. खातूनबी वाटे तसेच प्रथमेश एज्युकेशन सोसायटीचे सदस्य - श्री.राजेंद्र पाटील,श्री.सुनिल हिंगलजे,श्री.विश्वनाथ पाटील,श्री.धन्यकुमार पाटील,श्री.राजू तराळ,श्री सुरेश कुंभार,श्री मुन्वर मुजावर,श्री.मोईनुद्दीन वाटे, श्री.विजय काळे,श्री.विनायक भाटले,श्री.विनायक सावंत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
