कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
मजरेवाडी येथील दूध पावडर चोरीप्रकरणी आरोपीना कुरूंदवाड न्यायालयासमोर उभे केले असता सोमवार पर्यंत पोलिस कस्टडी देण्यात आली आहे . अशी माहिती कुरूंदवाड पोलिसांकडून मिळाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती हेडकॉन्स्टेबल नागरगोजे यांनी दिली आहे.
मजरेवाडी येथील आर के नगर येथे महादेव धरणगुत्ते यांच्या घरातील होलसेल खवा तयार करण्यासाठी ठेवलेली दूध पावडर घरातील पत्रे काढून चोरी केल्याप्रकरणी हेरवाड येथील तीनजनावर शनिवारी 25 जून रोजी कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवार 27 जून पर्यंत या तिन्ही आरोपींना पोलिस कस्टडी सुनावली असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल नागरगोजे यांनी दिली आहे . एकंदरीत मजरेवाडी येथील आर के नगर येथे होलसेल खवा तयार करण्यासाठी अधिकृत दूध पावडर वापरण्यास परवानगी आहे काय याबाबत अन्नभेसळ प्रतिबंधक विभागाकडून चौकशी होणार काय अशी चर्चा आहे कुरुंदवाड शहरासह परिसरामध्ये आहे.
