Top News

सतत आपल्या बरोबर असनारा रेडिओ म्हणजे आपला मित्र : प. पू. मल्लय्या स्वामीजी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क

जुन्या काळांतील एक प्रभावी प्रसार माध्यम म्हणजे रेडिओ, (आकाशवाणी) तर सर्व सामन्यांच्या घरोघरी असा एक रेडिओ असायचा व याच्या माध्यमातून साहित्य, शेती विषयी, आपल्या परंपरा, संस्कृती विविध खाद्य पद्धर्थांची ओळख, पर्यटन आपली आवड, आपले मनोरंजन विविध माहीती अश्या प्रकारे आपली सकाळ रेडिओ नेच सुरवात होत होती व रात्री उशिरा पर्यंत रेडिओ आपल्या सोबत असत होता, सद्याचा या संगणकीय बदलत्या काळात ही रेडिओ चे अस्थित्व अबाधीत आहे. असे आशिर्वचनपर मत व्यक्त करतांना परम पूज्य श्री मल्लय्या स्वामीजी (शिवानंद मठ घोडगेरी) यांनी व्यक्त केले.

      ते महिला कल्याण संस्थाच्या "नम्मूर बानूली " (आपले गांव आकाशवाणी ) व कर्नाटक पत्रकार संघ यांच्या संयुक्त सहकार्याने नुकतेच करगुप्पी,तालुका हुक्केरी, येथील 'नम्मूर बानूली ' 90,8, एफएम, यल्लापूर, केंद्राच्या ७ व्या वार्षिकोत्सव आणि चर्चात्मक कार्यक्रमा प्रसंगी स्वामीजी बोलत होते.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक राज्य पत्रकार संघाचे राज्याअध्यक्ष मुरगेश शीवपूजी हे होते. मुलींच्या गणेश स्तुतीने कार्यक्रमाची सुरवात झाली. उपस्तीतांचे स्वागत वैजयंती चौगला यांनी केले. तर मुरगेश शीवपूजी यांनी प्रास्ताविकात कर्नाटक पत्रकार संघटनेचा एकंदरीत विविध कार्याचा आढावा घेतला.

    या प्रसंगी सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष एम एस चौगला, किरण चौगला, व ऍड मंजुनाथ तोरगल, व आकाशवाणीचे केंद्र निर्देशक अक्षय कुलकर्णी यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करणयात आले. 

        या प्रसंगी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तर कर्नाटक पत्रकार संघटनेतील ६० वर्षा वरील पत्रकारांचा सत्कार शाल पुष्पहार देऊन स्वामीजींच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आला, तसेच नवीन सभासदांना संघटनेचे ओळ्ख पत्रांचे वितरण करण्यात आले.

       या वेळी अक्षय कुलकर्णी यांनी आपल्या आकाशावाणी केंद्राच्या माध्यामातून ग्रामीण भागांतील महिलां, युवका,मुले, शेतकऱ्यांसाठी दिवसभर प्रसारीत होत असलेल्या कार्यक्रमाची समग्र पणे माहिती करून दिली. तर ऍड मंजुनाथ तोरगल यांनी आधुनिक प्रसार मध्यमांचे जाळे वाटसप, यु ट्यूब ट्यूटर, फेसबुक ईसटागारम आदीनवरून येणारे मेषेज व त्यांचा परिणाम व कायद्याची बाजू या विषयी आपले सविस्तर मत मांडून मार्गदर्शन केले.

     या कार्यक्रमास बेळगांव, संकेश्वर, रामदुर्ग रायबाग,अथणी, हुक्केरी निपाणी भागांतील शैकडो च्या वर पत्रकार सदस्य उपस्तीत होते. किरण चौगले यांनी आभार मानले.

थोडे नवीन जरा जुने