Top News

माजी उपसरपंच श्रीपती माने यांच्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रम

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क

 शिरोळचे माजी उपसरपंच व कै श्रीपती माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेचे संस्थापक चेअरमन कै श्रीपती पांडुरंग माने यांच्या 23 व्या स्मृतिदिना निमित्ताने शुक्रवारी 10 जून रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

            येथील श्रीपती माने स्मृती विचार मंच व कै श्रीपती माने कृष्णामाई सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, कै श्रीपती माने यांनी सामान्य गोरगरीब ,श्रमिक कष्टकरी व अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी विशेष कार्य केले असून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

          शुक्रवारी 10 जून रोजी सकाळी 11 वाजता शिरोळ येथील घालवाड- कनवाड मार्गावरील कै श्रीपती माने (अण्णा) यांच्या स्मृती स्थळास अभिवादन कार्यक्रम होईल, त्यानंतर दुपारी 2 वाजता निमशिरगाव येथील आई वृद्धाश्रम या संस्थेमधील वृद्ध माता- पित्याना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात यावीत यासाठी शिरोळ येथील वीटभट्टी , ऊस तोड मजूर कामगारांच्या गरीब, गरजू मुलांना खाऊ आणि शालेय विद्यार्थ्यांना वह्या - पेन वाटप करण्यात येणार आहे.

थोडे नवीन जरा जुने