Top News

संपादकावर जीवघेणा हल्ला ; सदर घटना सीसीटीव्हीत कैद



निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

बेळगावमधील लोकवार्ता या कन्नड दैनिकाचे संपादक हिरोजी मावरकर यांच्यावर तीन दिवसांपूर्वी अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला आहे, अशी माहिती गोकाक येथील रहिवासी व हिरोजी मावरकर यांचे बंधू लोकक्रांती दैनिकाचे संपादक श्रीनिवास मावरकर यांनी दिली. सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून यामध्ये एकजण हल्ला करताना दिसत आहे. गोकाक येथील त्यांच्या घराशेजारी हा हल्ला केला असल्याचे श्रीनिवास यांचे म्हणणे आहे.

     धारदार शस्त्रांनी झालेल्या या हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातावर प्राणघातक वार झाले आहेत. गोकाक येथील उमरानी हॉस्पिटलमध्ये हिरोजी यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

थोडे नवीन जरा जुने