निरंजन कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जीवन संघर्षमय जगून मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सर्व भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला न्याय, समता, बंधुता व मतदानाचा हक्क देऊन मुख्य प्रवाहात आणण्याचे वैशिष्ट्यपूर्ण काम केले. असे प्रतिपादन माजी महापौर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका तथा आरपीआय राज्य सचिव विवेक आप्पा कांबळे यांनी भिवशी येथे भारतीय दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी वर्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट तसेच मातोश्री हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर अध्यक्ष सतिश माळगे यांच्यावतीने आयोजित केलेल्या कालकथित मधुकर श्रावण कांबळे व काल कथित धोंडीराम कांबळे गुरुजी वैचारिक व्यासपीठावरून सलाम सविधान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय बसवेश्वर तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कपील कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक युवानेते अमित शिंदे यांनी केले.
यावेळी विचारपीठावर प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून, अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष उत्तम अण्णा पाटील, एससी सेलचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष मल्लेश अण्णा चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वडर.. उपस्थित होते.
पुढे बोलताना विवेक अप्पा कांबळे म्हणाले, आजच्या युवकाने दलित पॅंथर सारखी चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये उभी करून समाजत होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी डॉ.आंबेडकरांच्या चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या निपाणी भागातील सर्व कार्यकर्त्यांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आले.
यामध्ये डॉ. श्रीकांत वराळे, डॉक्टर अच्युत माने, डॉक्टर एन.डी.जत्राटकर, एड.अविनाश कट्टी, प्राध्यापक जी डी कांबळे, प्राध्यापक सुरेश कांबळे, आयु:श्याम कांबळे, दीपक मधाळे, सुधाकर माने, कपिल कांबळे, अशोक लाखे, यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये कवी किरण मेस्त्री युवा नेते उत्तम
अण्णा पाटील, मल्लेशअण्णा चौगुले, सत्कार मूर्ती डॉक्टर अच्युत माने, कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष जिल्हा नेते आर पी आय आठवले गट सतीश माळगे, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी या कार्यक्रमास भिवशी गाव कामगार पाटील अशोकराव पाटील, चेअरमन इंदिरा मल्टीपर्पज सोसायटी शिवगोंडा पाटील,माजी जिल्हा पंचायत सदस्य श्रीकांत देशमुख,ममदापूर ग्रामपंचायत सदस्य निरंजन पाटील,जानबा कांबळे,आर पी आय तालुका अध्यक्ष कुंडलिक कांबळे, कागल चे युवा नेते रमेश कांबळे,सचिन भिवसे,बबन भोसले,चंदू कांबळे,पंचानंद खराडे, सागर कांबळे, विकास मेस्त्री, कैलास ढाले,संदीप माने,बाबुराव माने, काकासो कांबळे, सुहास माने, गोपाळ मेस्त्री, भिकाजी कांबळे,अभिजीत कांबळे, साताप्पा कांबळे, आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार दीपक शेवाळे यांनी केले.
