इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
टाकळीवाडी (ता. शिरोळ) या ठिकाणी ताईबाई मंदिराचे जीर्णोद्धार सोहळा विधवा महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हेरवाड पॅटर्न राबवून विधवा प्रथा बंद होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टाकळीवाडी या ठिकाणी असणाऱ्या ताईबाई मंदिराचा जीर्णोद्धार व सुहासनीचा कार्यक्रम विधवा महिलांना मानसन्मान देऊन त्यांच्या हातून मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला. चर्मकार समाजाच्या वतीने विधवा महिलांना पूजेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. कोणत्याही प्रकारचा ठराव न घेता प्रत्यक्ष विधवा महिलांना आमंत्रित करून देवीच्या जीर्णोद्धाराचे काम विधवा महिलांच्या हस्ते करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचे काम टाकळीवाडी या गावातील नागरिकांनी केले आहेत. ज्या विधवा महिला विवाह करण्यास इच्छुक असतील त्यांना ग्रामपंचायततर्फे प्रोत्साहनपर दहा हजार रुपये अनुदान व मान सन्मान देऊ असे घोषित करण्यात आले. चंद्राबाई निर्मळे, रेश्मा निर्मळे, सरिता निर्मळे, शोभा निर्मळे इ. विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी उपसरपंच बाजीराव गोरे, माजी सैनिक रमेश निर्मळे, आप्पासो निर्मळे, भरत निर्मळे, मोहन निर्मळे, तुकाराम चिगरे, मंगराया हक्के, ज्योतीराम निर्मळे, मल्लू निर्मळे, मोहन निर्मळे, नामदेव निर्मळे त्याचबरोबर समस्त चर्मकार समाज बांधव, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
