जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे झालेल्या एमपीएससी राज्यसेवा अंतिम परीक्षेतून कोल्हापूर जिल्ह्यातून ७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. त्यामध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसच्या ४ विद्यार्थ्याची विविध उच्च पदांवर निवड झाली आहे.
यामध्ये घोडावत अकॅडमीच्या अपर्णा जयसिंग यादव निगवे दुमाला ( ता. करवीर) यांची नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे. ही ईडब्ल्यूएस महिला प्रवर्गातून राज्यात पहिली आली आहे. पूजा संजय अवघडे हिची नायबतहसीलदारपदी निवड झाली असून तिने अनुसूचित जाती प्रवर्गात महिलांमध्ये राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. ती मूळची राजारामपुरी, कोल्हापूर येथील आहे. म्हाळुंगे (ता. करवीर) गावचा विश्वजीत जालंदर गाताडे यांची सहाय्यक राज्यकर आयुक्तपदी निवड झाली असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. हळदी (ता. करवीर) येथील ऐश्वर्या जयसिंग नाईक यांची भूमिअभिलेख उपअधीक्षकपदी निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण मार्गदर्शन संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसचे लाभले.
निकाल जाहीर झाल्यानंतर घोडावत अकॅडमीच्या कोल्हापूर शाखेमध्ये या सर्वांचा सत्कार करण्यात आला. अपर्णा यादव हिला पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखत यासाठी मार्गदर्शन मिळाले. तर विश्वजीत, ऐश्वर्या, पूजा या तिघांना मुलाखतीसाठी मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल अध्यक्ष संजयजी घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक व प्राचार्य विराट गिरी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना कोल्हापूर शाखा प्रमुख प्रा.अक्षय पाटील, प्रा.अमोल पाटील, प्रा. सचिन शिलवंत, प्रा.सूर्यकांत कांबळे, प्रा.भरत साबळे तसेच इतर सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
