हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एसटी सेवेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हेरवाड़ येथे क्रांती ग्रुपच्यावतीने कुरुंदवाड हुपरी या बसचे स्वागत करून एसटीला हार अर्पण करण्यात आले. यावेळी चालक-वाहक यांचा सत्कार करून सर्व प्रवाशांनाही शुभेच्छा देण्यात आल्या.
गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, व्यापारी आदिंचे हक्काचे वाहन म्हणजे लाल परी आज ७५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. चालक, वाहक आणि कर्मचारी स्टाफ यांना शुभेच्छा दिल्या आणि गरीबाची लाल परी अशीच अखंड प्रवाही राहो हीच अपेक्षा यावेळी नागरिकांनी केली. यावेळी क्रांती ग्रुपचे अध्यक्ष सदानंद आलासे, उपाध्यक्ष जमीर मुल्ला, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते युनुअसल्ली जमादार, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते बाबासाहेब नदाफ, राजू गोंधळी, लखन माने, झाकीर गलगले, सुरेश मस्के उपस्थित होते.
