हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते. रयतेनं कामासाठी सरकारकडे येण्याची गरज नाही, सरकारंच रयतेच्या दारात जाईल, हा विचार त्यांनी दिला. शिक्षणाशिवाय बहुजनांचा विकास शक्य नाही हे लक्षात आल्यानंतर शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली करुन दिली. कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचं केलं. असे राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य शब्दात सामावणारे नाही, असे प्रतिपादन सरपंच सुरगोंडा पाटील यांनी केले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दीनिमित्त अभिवादन प्रसंगी सरपंच पाटील बोलत होते. यावेळी गावातील पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या उपस्थितीतीत १०० सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी वेटलिफ्टिंगमध्ये उत्तुंग यश संपादन केल्याबद्दल तेजस जोंधळे व भूमिका मोहिते यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत धनंजय धोत्रे यांनी तर प्रास्ताविक यादव सर यांनी केले. यावेळी उपसरपंच विकास माळी, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन वैभव पाटील, कर्मवीरचे चेअरमन सागर पाटील, सर्कल काळगे, ग्रामविकास अधिकारी पी.आर. कोळेकर, पोलिस पाटील रेखा जाधव, तलाठी आय.बी. मुल्ला, स्वाभिमानीचे बंडू पाटील, जीवन कांबळे, अर्जुन जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी पटेल, आप्पासो जोंधळे, जकेंद्र पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

