अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला सकाळपासूनच त्यांच्या जयसिंगपूर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, निवासस्थानी प्रत्यक्ष भेटून कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक, कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, उद्योगपती आण्णासाहेब चकोते, अरिहंत उद्योगसमूह बोरगावचे उत्तम पाटील, प्रांताधिकारी विकास खरात, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने, शिरोळ च्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ, सांगली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नंणदकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के, पोलीस निरीक्षक बोरिगिड्डे, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पाखरे, जयसिंगपूरच्या माजी मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी, यांच्यासह शरद सहकारी साखर कारखाना, कोल्हापूर जिल्हा सहकारी सूतगिरणीसह यड्रावकर उद्योग व शिक्षण समूहातील सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या, तसेच शिरोळ हातकणंगले परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी व मान्यवरांनी भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले, फोनवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, बांधकाम मंत्री दत्तामामा भरणे, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, कर्नाटकचे माजी मंत्री रमेश जारकीहोळी, काका पाटील, वीरकुमार पाटील माजी खासदार निवेदिता माने, भालचंद्र पाटील सांगली, आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, शिवसेना नेते अरुणभाई दुधवडकर, माजी आमदार महादेवराव महाडिक, गुरुदत्त शुगर चे प्रमुख माधवराव घाटगे दत्त उद्योगसमूहाचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील अनेक सहकारी आजी माजी आमदार लोकप्रतिनिधी या सर्वांनी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन केले आणि शुभेच्छा दिल्या,
तत्पूर्वी सकाळी राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी यड्राव येथील सहकारमहर्षी स्वर्गीय शामरावआण्णा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि दुपारपर्यंत निवास्थानी थांबून शुभेच्छा स्वीकारल्या राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा वाढदिवस तालुक्यात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये महाआरोग्य शिबिराचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते, अनेक गावांमधून वृक्षारोपण तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते, ढोल ताशा वादन स्पर्धा, व्हॉलीबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा यांचेही आयोजन शिरोळ तालुक्यात मान्यवर कार्यकर्त्यांच्या कडून केले होते, एकूणच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा ५३ वा वाढदिवस अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला.
