Top News

बांबरवाडी,दत्तवाड शाळेत छत्रपती शाहू स्मृतीशताब्दी कार्यक्रम संपन्न

 दत्तवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

          विद्या मंदिर बांबरवाडी, दत्तवाड मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त प्रतिमापूजन,१०० सेकंद कार्यक्रम, विद्यार्थांच्या वक्तृत्व स्पर्धा घेणेत आल्या.

 प्रारंभी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य दिलीपकुमार कुरुंदवाडे यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी पावडोबा विकास संस्थेचे चेअरमन- श्री.पांडुरंग चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा -सौ.कविता सचिन पाटील, सदस्या- सौ.सारिका राणे,सौ.कोमल चव्हाण,सौ. आश्विनी चव्हाण,सदस्य -श्री.दिलीप चव्हाण,श्री.नामदेव चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते -श्री.पांडुरंग चव्हाण,श्री. संभाजी मोहिते,श्री.सद्दाम काले, अंगणवाडी सेविका -सौ. रेखा चव्हाण, सौ. शुभांगी उरुणकर,पालक, विद्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक- श्री.दिलीप शिरढोणे तर आभार अध्यापिका सौ.सरिता राजमाने यांनी मानले.

थोडे नवीन जरा जुने