Top News

अर्जुनवाड : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळून आदरांजली

  



राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

अर्जुनवाड येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी या निमित्त हरी मंदिर येथे सकाळी 10 वाजता 100 सेकंदासाठी स्तब्धता पाळूनआदरांजली वाहण्यात आली.

    सकाळी लवकर या परिसराची स्वछता करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत अर्जुनवाड च्या सरपंच स्वाती कोळी, उपसरपंच संतोष दुधाळे सहित ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, विद्या मंदिर. मराठी शाळेतील दत्ताजीराव कदम हायस्कूल मधील विद्यार्थी शिक्षक वर्ग,महसूल विभागातील तलाठी उमेश माळी, कोतवाल महादेव पवार, आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर अधिकारी,आशा सेविका , अंगणवाडी सेविका गावातील ग्रामस्थ ग्रामपंचायत चे कर्मचारी वर्ग हजर राहून राजांना आदरांजली वाहण्यात आली.

थोडे नवीन जरा जुने