घालवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
2005 नंतर मुबंई मध्ये कधीही महापूर आला नाही कारण तिथे महापुरावर तात्काळ उपाय शोधले सांगली कोल्हापूर सह शिरोळ तालुक्यात येणाऱ्या महापुरावर उपाय शोधला नाही म्हणून लागोपाठ महापूर येऊन हा भाग उध्वस्त होत आहे याला शासनाचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचे काल घालवाड येथे आलेल्या जन संवाद यात्रेच्या जाहीर सभेत धनाजी चुडमुंगे बोलत होते. ते पुढे म्हणाले की शासनाला महापुरावर कायमस्वरूपी उपाय शोधण्यास भाग पाडायचे म्हणून 1 मे ला कुरुंदवाड येथे पूर परिषद आयोजित केली आहे. घालवाड हे गाव 100% पूर बाधित आहे आपण सर्वांनी झाडून या पूर परिषदेला आल्यास शासन पुरमुक्ती च्या दिशेने प्रयत्न करेल अन्यथा सध्याच्या धोरणा नुसार पूर रेषेत येणाऱ्या लोकांना कायमचे स्थलांतर व्हावे लागेल.
या सभेत आंदोलन अंकुश चे तालुकाध्यक्ष दिपक पाटील उपाध्यक्ष संभाजी शिंदे दिगंबर सकट यांनीही संबोधित केले. रात्री उशिरा पर्यंत चाललेल्या सभेला घालवाडकर नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
2021 च्या महापुरावेळी तहसीलदार कलेक्टर यांनी रात्री 12 पर्यंत तालुक्यातील गावेच्या गावे रिकामी केली. नागरिकांनी ही प्रशासनाला सहकार्य करून मिळेल त्या प्रकारे सुरक्षित ठिकाणे शोधली. प्रशासनाने स्थलांतर केलेल्या नागरिकांना 1 रुपयाचीही मदत केली नाही आणि पूर ओसरल्या नंतर घरात पाणी आले नाही म्हणून सानुग्रह अनुदान ही दिले नाही.
स्थलांतर केलेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान द्यावे म्हणून शासन निर्णय झाला तरी तालुक्यातील 10, 000 कुटूंबांना अजूनही सानुग्रह अनुदान दिले नाही.
इंग्रज परवडले पण हे नोकरशहा नको अशी अवस्था या तालुक्याची झाली आहे यामुळेच आता तुमची भीक नको पूर येऊ नये म्हणून उपाय योजना करा अशी मागणी आंदोलन अंकुश करत आहे त्याला साथ द्या असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी जन संवाद सभेत केले.
