राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील दत्ताजीराव कदम हायस्कूल अर्जुनवाडची विद्यार्थ्यानी कु. शर्वरी विनोद पाटील हिला इयत्ता ८ वी मध्ये घेण्यात आलेल्या एनएमएमएस या शिष्यवृत्ती परीक्षेत पास झाल्याने तिला छ. शाहू महाराज संशोधन , प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी पुणे ) यांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे . याबददल तिचे संस्थेचे अध्यक्ष अनिलरावजी यादव, उपाध्यक्ष विराजसिंह यादव,सचिव बजरंग संकपाळ विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ.के.आर.कदम मॅडम, वर्गशिक्षक एम.एम.माळी सर, एस.एस.पाटील मॅडम, कु.ए.ए.खोत मॅडम, पी.आर.कळंत्रे सर, आर. एच.कांबळे सर, सौ.आर.व्ही.चौधरी मॅडम, एस.बी.कुंभार सर, सौ. एस.डी.साळूंखे मॅडम, श्री.एस. डी. दुधाळे आदींनी शर्वरी पाटील हिचा शाळेमध्ये सत्कार करून तिचे अभिनंदन केले. तिला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका के .आर. कदम मॅडम, वर्गशिक्षक एम. एम. माळी सर, सौ.आर. व्ही. चौधरी मॅडम व आई वडिलांचे मार्गदर्शन मिळाले. याबददल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
