Top News

जयसिंगपुरात महागाईच्या विरोधात युवासेनेचा शंखध्वनी व थाळी नाद

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील क्रांती चौकात इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीच्या विरोधात केंद्र शासनाचा निषेध करण्याकरिता युवासेनाचे थाळी बजाओ आंदोलन झाले. शिरोळ तालुक्यातील युवासेना,युवतीसेना महिला आघाडी व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

   इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी केलेल्या आवाहनानुसार व युवासेना जिल्हा विस्तारक डॉ.सतिश नरसिंग यांच्या मार्गदर्शनाने सदरचे आंदोलन येथील क्रांती चौकात रविवार दि.३ रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले, अच्छे दिनच्या नावाखाली केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहे. डिझेल पेट्रोल गॅस यासह जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ दरवाढ करून पिळवणूक करीत आहे.भाजपने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. युवासेनेचे जिल्हा उपअधिकारी प्रतीक धनावडे म्हणाले,भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी सर्वसामान्यांसाठी मोठमोठी आश्वासने दिली होती. आज त्या सर्व आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे.अच्छे दिन, खात्यातील पंधरा लाख रुपये, इंधन दरवाढ रोखणे या सर्व बाबींचा त्यांना आता विसर पडला आहे. असे मनोगत व्यक्त करून निषेध व्यक्त केला.यानंतर उदगाव जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.यावेळी भाजप सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी, शंखध्वनी व थाळी वाजवून निषेध व्यक्त केला.  

     या आंदोलनात कोल्हापूर जिल्हा युवा अधिकारी शिवाजी पाटील, जिल्हा उपप्रमुख मधुकर पाटील,  तालुकाप्रमुख वैभव उगळे, युवासेना उपप्रमुख प्रतिक धनवडे,  युवातालुका प्रमुख नीलेश तवंदकर, माजी नगरसेवक पराग पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक अण्णासाहेब बिलोरे, शहरयुवा अधिकारी आकाश शिंगाडे, जयसिंगपूर शहरप्रमुख तेजस कुराडे - देशमुख महिला आघाडी शहरप्रमुखपद अर्चना भोजणे युवती सेनेच्या तेजस्विनी रजपूत,  शुभांगी झळकी, रंजना चौगले, मनीषा पवार, सूरज भोसले, सुनील शिंदे, रतन पडियार, शुभम मलमे, अनिल पवार, गणेश तावरे, यांच्यासह शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने