इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाडसह परिसरात अवैध देशी मद्याची विक्री जोमात सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून हा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी चोरून मद्यविक्री होत आहे. अशा विक्रेत्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी पुढे येण्यााची गरज आहे.
बेकायदेशीर मद्य विक्रीच्या माध्यमातून अनेकजण गब्बर झाले आहेत. कारवाई झाली तर पंटरला बकरा करून काही दिवसात पुन्हा त्यांचा धंदा जोरात सुरू होतो. परवाना नसतानाही चोरून अवैद्य दारू विकणाऱ्याची संख्या दत्तवाड मध्ये मोठी आहे आहे. नियमानुसार शाळा, महाविद्यालय, मंदिरे आदी परिसरात अवैध धंद्यांना बंदी असताना शासनाच्या नियमाला पायदळी तुडवत दत्तवाड येथील हनुमान मंदिराच्या शेजारी व खंडोबा मंदिराच्या शेजारी अवैद्य दारूची मोठ्या प्रकरणात विक्रीत केले जात आहे. त्याचबरोबर गावात ठिक-ठिकाणी मद्यविक्री जोमात सुरू आहे. या अवैद्य मद्यविक्री अड्ड्यावर संबंधित विभागाकडून कारवाई होते. पण कारवाईच्या दुसऱ्या दिवसापासून हे अड्डे पुन्हा जोमाने सुरू होतात. या अवैद्य विक्रीचे मंदिर परिसरातील नागरिकांना व भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी दत्तवाड परिसरात सुरू असलेले अवैद्य विक्रीवर पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईची गरज असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
