१ घोडा व अनेक शेळ्या-मेंढ्या मगरीने केल्या फस्त
| संग्रहित |
इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील दतवाड येथील आण्णासो गिराजे या शेतकऱ्याच्या शेतीपंपास जवळपास १३ फुट मगरीने वेटोळे घातले होते. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सदरची मगर फिरत असून या मगरीने आज अखेर १ घोडा व अनेक शेळ्या-मेंढ्या फस्त केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून सदरची मगर या परिसरात दहशत निर्माण करत असून याकडे मात्र संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक हा राजू शेट्टी यांनी गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर खुद्द राजू शेट्टी यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना उद्देशून दत्तवाड येथील मगरीने माजवलेली दहशत सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, आण्णासो गिराजे मु. पो. दत्तवाड ता. शिरोळ जि. कोल्हापूर येथील शेतक-यांच्या शेतीपंपास जवळपास 13 फुट मगरीने वेटोळे घातलेले होते. कदाचित हि वेळ रात्रीची असती तर होत्याच नव्हत झाल असत. आजपर्यंत या मगरीने १ घोडा व अनेक शेळ्या मेंढ्या फस्त केल्या आहेत. असे पोस्ट राजू शेट्टी यांनी केले आहे.
दरम्यान दतवाड सह परिसराला दूधगंगा नदीचे पात्र आहे, वारंवार या परिसरात मगरीची दहशत पाहायला मिळते. वर्षाला येणारा महापूर यामुळे मगरींची संख्या वर्षानुवर्षे वाढत आहे. याचा मोठा फटका मात्र शेतकरी वर्गाला बसत आहे. रात्री-अपरात्रीच्या वेळी शेतकरी जीव मुठीत घेऊनच शेतात पाणी पाजण्यासाठी जातो. कधी कुठून मगर येईल, कोल्हा, बिबट्या, साप येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे राजू शेट्टीं यांच्या मागणीला शेतकरी वर्गातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी 👇येथे क्लिक करा