हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील एकता चौक लगत असलेल्या ग्रामस्थांच्या दारात गटारीचे सांडपाणी येत असल्याने या परिसरातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थातून संताप व्यक्त केला जात आहे.
हेरवाड येथील प्रमुख मार्गालगत गटार नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे या भागातील संपूर्ण सांडपाणी एकता चौक येथील ग्रामस्थांच्या घरासमोर येत असल्याने याचा नाहक त्रास येथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायती कडे वारंवार तक्रार करूनही ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान या प्रश्नाचा विचार ग्रामपंचायतीने करून तातडीने सदरच्या पाण्याचा निचरा इतरत्र करून या भागात गटार बांधावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.