राहूल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :
अर्जुनवाड हे गाव दोन राज्यांना, दोन जिल्ह्याना जोडणारा प्रमुख रस्ता असल्याने वाहन धारकांची नेहमी ये जा मोठया प्रमाणात असते आणि नव्याने होत असलेल्या राज्य महामार्ग रस्त्याचे काम अंत्यत संथ गतीने सुरु असल्याने अपघातास आमंत्रण दिल्याचे अर्जुनवाड मध्ये पहाव्यास मिळत आहे.
दत्ताजीराव कदम हायस्कूल जवळ रस्त्याच्या कामासाठी खुदाई करण्यात आली आहे आणि त्यात गटारी चे पाणी साठल्यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास होत असून कधी ही यामुळे अपघात घडू शकतो. गेल्या महिना दीड महिन्यापूर्वी या रस्त्याच्या संथ गतीच्या कामामुळे दोघांचा बळी गेला असून त्या घटनेतून बांधकाम विभाग कोणताही धडा घेतला नाही.असे दिसते रस्त्याचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी प्रवासी आणि ग्रामस्थांतुन होत आहे.