टाकळीवाडी/शिवार वृत्तसेवा
गुरुदत्त शुगर्सने महापूर, कोरोन , लाळ -खुरकत लसिकरण सोबतच कोरोना काळात सामाजिक बांधिलके जोपासत हजारो लोकाचा आधारवड बनला. कारखान्याचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या १४ फेब्रुवारी होणाऱ्या वाढदिवसादिवशी हार, तुरे या पारंपारिक पध्दतीला छेद देऊन वह्या स्वरूपात शुभेच्छा स्विकारून सामाजिक कार्याची नाळ घट्ट करणार आहेत. दुपारी ३ ते ५ या वेळेत वाढदिवसाचा कार्यक्रम होणार आहे.
गेल्या आठ दिवसापासून गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहूलदादा घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबिराला गावा-गावातून महाविद्यालयीन तरुणाचा , महिलाचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षापासून सुरु केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचबरोबर या रक्तदानाचा लाभ तालुक्यातील रक्ताची गरज भासणाऱ्या अनेक रुग्णांना झाला आहे. तसेच सामाजिक कार्याची नाळ आणखी घट्ट व्हावी, या हेतूने यासाठी राहुलदादा घाटगे यांनी हार, तुरे, गुच्छ न स्विकारता वह्या स्विकारुन आपला वाढदिवस साजरा करणार आहेत.