Top News

चिंचवाड व कारखाना साईट परिसरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

  २०२१ चा विक्रम मोडला ; आज अखेर २२२७ जणांनी केले रक्तदान



राहुल डोंगरे / शिवार न्यूज नेटवर्क :

गुरुदत्त साखर कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त सैनिक टाकळी येथील कारखाना साईट येथील सेफ्टी ऑफिस हॉल व चिंचवाड येथील हनुमान मंदिरामध्ये झालेल्या रक्तदान शिबिरात ३०३ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त २०२१ मध्ये कारखाना परिसरातील विविध गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरात २०४० हून अधिक जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली होती. याही वर्षी राहुल घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षभरामध्ये शिरोळ तालुक्यात रक्ताची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांना तसेच कोरोना काळात अनेक रुग्णांना राहुल घाटगे यांच्या माध्यमातून २५० हून अधिक जनाना मोफत रक्त पुरवठा देऊन जीवनदान देण्यात आले. त्यामुळे अनेक जणांना या रक्तदान शिबिराचा मोठा लाभ मिळाला आहे. या वर्षी वाढदिवसानिमित्त शिरोळ . तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड, अकिवाट, बस्तवाड, हेरवाड, दत्तवाड या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होऊन २२२७ जणांनी आता पर्यत रक्तदान केले आहे. यानंतर उद्या सोमवारी कारखाना साईट व घोसरवाड येथील मरगुबाई मंदिर या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिरात युवक वर्गासह नागरीकांनी व महिलांचा मोठ्या सहभाग घेवून सामाजिक कार्याला हातभार लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

दरम्यान गुरुदत्त शुगर्सने महापूर, कोरोना , लाळ -खुरकत लसिकरण सोबतच कोरोना काळात सामाजिक बांधिलके जोपासत हजारो लोकाचा आधारवड बनला. कारखान्याचे एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या १४ फेब्रुवारी होणाऱ्या वाढदिवसादिवशी कारखाना कार्यस्थळावर दुपारी ३ ते ५ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. हार, तुरे या पारंपारिक पध्दतीला छेद देऊन वह्या स्वरूपात शुभेच्छा स्विकारून सामाजिक कार्याची नाळ घट्ट करण्याचा मानस श्री.घाटगे यांनी व्यक्त केला आहे.

थोडे नवीन जरा जुने