३०८ जणांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी
सैनिक टाकळी / शिवार न्यूज नेटवर्क
गुरुदत्त साखर कारखान्याचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त सैनिक टाकळी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ३०८ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
राहुल घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त २०२१ मध्ये कारखाना परिसरातील विविध गावामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरात २०४० हून अधिक जणांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जोपासली होती. याही वर्षी राहुल घाटगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गेल्या वर्षभरामध्ये शिरोळ तालुक्यात रक्ताची गरज असणाऱ्या अनेक रुग्णांना तसेच कोरोना काळात अनेक रुग्णांना राहुल घाटगे यांच्या माध्यमातून २५० हून अधिक जनाना मोफत रक्त पुरवठा देऊन जीवनदान देण्यात आले. त्यामुळे अनेक जणांना या रक्तदान शिबिराचा मोठा लाभ मिळाला आहे. या वर्षी वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर, राजापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड, अकिवाट बस्तवाड, हेरवाड, मजरेवाडी, टाकळीवाडी, दत्तवाड आदी ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होऊन १९२१ हून अधिक जणांनी आता पर्यत रक्तदान केले आहे. यानंतर यानंतर आज शनिवारी सैनिक टाकळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ३०८ जणांनी रक्तदान केले.
यावेळी सरपंच हर्षदा पाटील, पोलिस पाटील सुनिता पाटील, हरिश्चंद्र पाटील, सीईओ उदय पाटील, पीआरओ विकास चौगुले, व्ही.टी. पाटील, शामराव पाटील, सी.डी. पाटील, मोहन वासमकर, तानाजी पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य, गावातील युवा वर्ग, ग्रामस्थ व कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.